मुसळधार पावसाने लोकल सेवा विस्कळीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

मुंबई - मुंबई शहर व उपनगरात आज (मंगळवार) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

मुंबई - मुंबई शहर व उपनगरात आज (मंगळवार) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

सोमवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने पहाटे जोर धरला. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली. गेल्या 24 तासांत सांताक्रुझमध्ये 103 मिमी पावसाची नोंद झाली, तर कुलाब्यात 69 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी शहरात अनेक भागांत पाणी साचले आहे. पावसाच्या प्रतिक्षेत असलेले मुंबईकर मुसळधार पावसाने सुखावले, पण लाईफलाईन विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. 

तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरू आहे, तर हार्बर रेल्वे अर्धा तास उशीराने धावत आहे. सीएसटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळ धीम्या मार्गावरील वाहतुकीवर ताण पडला आहे. दिवा स्थानकात गेल्या एक तासापासून एकही लोकल आलेली नाही. लोकलच्या खोळंब्याने नोकरीस झालेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: local disrupted by rains