घाटातून धावणार लोकल; नाशिक, पुण्यासाठी लवकरच चाचणी

मुंबई - कुर्ला येथील रेल्वेच्या कार्यशाळेत दाखल झालेली लोकल.
मुंबई - कुर्ला येथील रेल्वेच्या कार्यशाळेत दाखल झालेली लोकल.

मुंबई - ‘हेवी ब्रेक सिस्टिम’ असलेली अद्ययावत लोकल मुंबईत दाखल झाली आहे. कर्जत ते लोणावळा आणि कसारा ते नाशिक घाटांमध्ये या लोकलच्या चाचण्या या महिन्यातच घेतल्या जाणार आहेत. चाचण्या यशस्वी ठरल्यास मुंबई-नाशिक आणि मुंबई-पुणे लोकल सेवा सुरू होईल. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

मुंबई ते नाशिक आणि पुणे या मार्गांवरील दैनंदिन प्रवाशांची संख्या मोठी आहे. या मार्गांवर लोकल सेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांनी लावून धरली आहे. या पार्श्‍वभूमीवर लखनौ येथील रिसर्च डिझाईन्स ॲण्ड स्टॅंडर्डस ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) या संस्थेने पाहणी करून घाटात सामान्य लोकल धावू शकणार नाहीत, असा अहवाल दिला होता. त्यानंतर मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे घाटमार्गांवर चालवण्यासाठी अधिक सक्षम ब्रेक यंत्रणा असलेल्या (हेवी ब्रेक सिस्टिम) लोकलची मागणी केली होती. त्यानुसार चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यात अशी अद्ययावत लोकल तयार करण्यात आली. सामान्य लोकलमध्ये १६ ब्रेक असतात; मात्र या लोकलमध्ये ३२ ब्रेक आहेत. या लोकलची चाचणी घाटमार्गांवर लवकरच घेतली जाणार आहे. त्यानंतर मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक लोकल सेवेबाबत आरडीएसओ आणि मध्य रेल्वेचे अधिकारी निर्णय घेतील, असे सांगण्यात आले. 

त्यासाठी मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील कार्यशाळेत या लोकलमध्ये काही बदल केले जात आहेत. चाचणी यशस्वी झाल्यानंतरच घाटमार्गांवर लोकल सेवा केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com