मोटरमन्सचा ओव्हरटाईमला नकार, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मोटरमनच्या रिक्त जागा त्वरीत भरणे, सिग्नल ओलांडल्यास सेवेतून कमी करण्याची शिक्षा रद्द करा, या मोटरमन्सच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी मोटरमन्सनी ओव्हरटाईम न करता केवळ नियमित वेळेत काम करण्याचे मध्य रेल्वे मजदूर संघाने जाहीर केले आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मोटरमन्सनी ओव्हरटाईम काम करण्यास नकार दिला आहे. यामुळे सकाळी 8 ते 9 दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरच्या 15 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या मार्गावरची वाहतूक सध्या 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत.

मोटरमनच्या रिक्त जागा त्वरीत भरणे, सिग्नल ओलांडल्यास सेवेतून कमी करण्याची शिक्षा रद्द करा, या मोटरमन्सच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी मोटरमन्सनी ओव्हरटाईम न करता केवळ नियमित वेळेत काम करण्याचे मध्य रेल्वे मजदूर संघाने जाहीर केले आहे.

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि मोटरमन युनियनची दुपारी 12 वाजता सीएसएमटी इथे बैठक बोलवण्यात आली आहे. मोटरमन्सच्या असहकार आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. 

रेल्वेतील मोटरमनच्या 898 मंजूर पदांपैकी 229 पदे रिक्त आहेत. यामुळे सद्यस्थितीत रेल्वेच्या फेऱ्या सुरळीत पार पडण्यासाठी मोटरमनला ओव्हरटाईम करावा लागतो. 

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी वरील मोटरमन्सच्या असहकार आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दिवसभरात यामुळे रेल्वेच्या 350 लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागण्याची शक्यता आहे.

आम्ही कोणताही संप न करता नियमानुसार काम करणार आहोत. आतापर्यंत 24 हून अधिक मोटारमनसवर दाखल करण्यात आलेले चार्जशिट रद्द करावे. मोटारमनवर नोंदवण्यात आलेल्या चार्जशिटविरोधात शुक्रवारी निषेध नोंदवण्यात येणार आहे. रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ओव्हरटाईम न करण्याच्या निर्णयावर आमची संघटना ठाम आहे. मोटारमनने सिग्नल तोडल्यास त्याला कामावरून कमी न करता कमी शिक्षा द्यावी, जेणेकरून त्याचे मानसिक बिघडणार नाही आणि तो जोमाने काम करेल असे लेखी आश्वासन दया अशी मागणी करण्यात आली आहे.
- राजेश थोरात , अध्यक्ष, मुंबई ऑल इंडिया एसी एसटी  मंडळ

Web Title: local motorman decline for overtime work central railway become Disorganized