तोतया पोलिसाचे लोकलमध्ये महिलांशी अश्‍लील चाळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

घाटकोपर - पोलिस असल्याची बतावणी करत मध्य रेल्वेतून प्रवास करताना महिलांशी अश्‍लील चाळे करणाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी संशयितास गुरुवारी (ता. 29) अटक केली. सकाळी ठाण्याहून "सीएसएमटी'ला जाणारी लोकल घाटकोपर फलाट दोनवर येताच "आरपीएफ'चे प्रभारी ब्रजेशकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिव्यांगांच्या डब्यातून तोतया पोलिसाच्या मुसक्‍या आवळल्या.

नीलेश तानाजी कदम (वय 41) असे संशयिताचे नाव आहे. नीलेश आशापुरा इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीत सुरक्षा रक्षक आहे. लोकलचा प्रवास आरामदायक व्हावा, यासाठी तो रोज पोलिस असल्याची बतावणी करत दिव्यांगांसाठी राखीव असणाऱ्या डब्यात शिरायचा. इतर प्रवाशांना धाक दाखवत तो महिलांच्या आसनावर बसून प्रवास करायचा आणि त्यांच्याशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न करायचा. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे खळबळ उडाली होती. रेल्वे पोलिसांनी नीलेशचा कसून शोध सुरू केला. गुरुवारी सकाळी तो दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करत होता. त्या वेळी याच डब्यातून प्रवास करणारे आणि "सीबीआय'मध्ये सेवेत असणारे सागर बोरनारे यांना व्हायरल झालेल्या व्हिडिओतील व्यक्ती हीच असल्याचा संशय आला. त्यांनी याबाबत घाटकोपर आरपीएफचे प्रभारी ब्रजेश कुमार यांना तत्काळ माहिती दिली. कुमार यांनी सहकाऱ्यांसह घाटकोपर फलाट दोनवर सापळा लावला. त्यात नीलेश सापडला.

Web Title: Local police imposter obscene antics in women