लोकलमधले स्टंटबाज गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मुंबई - मध्य रेल्वेच्या चुनाभट्टी ते जीटीबी नगर स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये जीवघेणे स्टंट करणाऱ्या चौघांना वडाळा रेल्वे पोलिसांनी गुरुवारी (ता. 2) गजाआड केले. मोहम्मदअली अमीरअली शेख ऊर्फ मम्मा, मोहम्मद जहिद शेख ऊर्फ मुमताज, रोहित गजानन चौरसिया, शहबाज मोहम्मद जावेद खान अशी त्यांची नावे आहेत. स्टंटबाजी करताना मुमताजने प्रवाशाचा मोबाईल चोरल्याचा आरोप आहे. या चौघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या चौघांनी कुर्ल्याहून शिवडीला जाण्याकरिता सोमवारी (ता. 30) लोकल पकडली. चुनाभट्टी ते जीटीबी नगरदरम्यान त्यांनी हे स्टंट केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मुंबई - मध्य रेल्वेच्या चुनाभट्टी ते जीटीबी नगर स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये जीवघेणे स्टंट करणाऱ्या चौघांना वडाळा रेल्वे पोलिसांनी गुरुवारी (ता. 2) गजाआड केले. मोहम्मदअली अमीरअली शेख ऊर्फ मम्मा, मोहम्मद जहिद शेख ऊर्फ मुमताज, रोहित गजानन चौरसिया, शहबाज मोहम्मद जावेद खान अशी त्यांची नावे आहेत. स्टंटबाजी करताना मुमताजने प्रवाशाचा मोबाईल चोरल्याचा आरोप आहे. या चौघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या चौघांनी कुर्ल्याहून शिवडीला जाण्याकरिता सोमवारी (ता. 30) लोकल पकडली. चुनाभट्टी ते जीटीबी नगरदरम्यान त्यांनी हे स्टंट केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सहायक निरीक्षक रमेश लाहीगुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मम्मा, शहबाज, रोहितला कुर्ला, तर मुमताजला मुंब्रा येथून अटक केली. 

Web Title: local publicity stunt arrested in mumbai