सीएसएमटी ते गोरेगावदरम्यान 42 लोकल फेऱ्या वाढणार

Local
Local

गोरेगाव - हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगावपर्यंत चालणाऱ्या सध्याच्या लोकल फेऱ्यांमध्ये लवकरच वाढ केली जाणार आहे. सीएसएमटी ते अंधेरीपर्यंत चालणाऱ्या लोकलच्या फेऱ्या आता गोरेगावपर्यंत जाणार आहेत. अंधेरीपर्यंत चालणाऱ्या 42 लोकल फेऱ्यांचा लाभ आता गोरेगावपर्यंतच्या प्रवाशांना होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून पश्‍चिम रेल्वेवर नवीन लोकल वेळापत्रकही लागू होईल. त्यानुसार दहा लोकल वाढण्याची शक्‍यता आहे. चर्चगेटवरून सायंकाळी भाईंदरपर्यंत जाणारी विशेष महिला लोकल आता विरारपर्यंत चालवली जाणार आहे.

गोरेगावपर्यंत सुरू झालेल्या हार्बर लोकलचा जोगेश्‍वरी, गोरेगावला फारसा फायदा होत नाही. दिवसभरात कधी कधी येणाऱ्या लोकलही रद्द होत असत. गोरेगावपर्यंत येणाऱ्या लोकलच्या वेळा अजिबात उपयोगाच्या नसल्याचे प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी रेल्वेला कळवले होते; मात्र वेळापत्रकाची घडी बसायला उशीर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 42 फेऱ्या वाढल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंधेरी आणि बोरिवलीदरम्यान लोकलमधील सकाळ-संध्याकाळी होणारी गर्दीही कमी होईल.

विरार, डहाणूदरम्यान चार फेऱ्या वाढणार आहेत, तर वातानुकूलित लोकललाही सात अन्य स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. 1 नोव्हेंबरपासून वाढीव फेऱ्यांची संख्या एकत्रितपणे रोज सुमारे 1365 एवढी असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com