सामान्यांसाठी लवकरच लोकल सुरु होणार, ठाकरे सरकार देणार दिवाळी गिफ्ट?

पूजा विचारे
Wednesday, 28 October 2020

सर्व सामान्यांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. अशातच आता लवकरच सर्वसामान्य नागरिकांना लोकलनं प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 

मुंबईः  कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात मुंबईची लाईफलाईन लोकल सेवाही बंद ठेवण्यात आली. कोरोनाचं संकट पाहता गेल्या सात महिन्यांपासून सर्वांसाठी लोकल बंद आहे. महिल, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली. त्यात सर्व सामान्यांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. अशातच आता लवकरच सर्वसामान्य नागरिकांना लोकलनं प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 

सर्वसामान्यांसाठी लवकरच सुरु करण्याचा विचार असल्याचं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. ट्विटरवर प्रवाशांनं केलेल्या प्रश्नाला त्यांनी अशा पद्धतीचं उत्तर दिलं आहे. 

लोकल बंद असल्यामुळे कामासाठी मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांना बस किंवा रस्ते मार्गानं जावे लागते. परिणामी ट्रॅफिकमध्ये त्यांचा अर्धा वेळ जातो, यामुळे एका संतप्त प्रवाशानं ट्वीट केलं आणि  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.

या पत्रात या प्रवाशानं महिलांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली तशी सर्वसामान्यांना आणि व्यावसायिक, कर्मचारी यांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे, असे ट्वीट करत खंत व्यक्त केली होती. 

अधिक वाचा-  संजय राऊतांचा पुन्हा एकदा कंगना राणावतला टोला

या संतप्त प्रवाशाच्या ट्विटला विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं. या उत्तरात त्यांनी लिहिलं की, पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ.  यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

राज्य सरकार आणि रेल्वे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत खासगी क्षेत्रात काम करणारे नोकरदार आणि सर्वच प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबत चर्चा झाली होती. महिलांना ज्याप्रकारे लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली त्याच प्रमाणे अन्य प्रवाशांना परवानगी देता येईल का?, त्यात वेळेचे बंधन घालावे का? याविषयी बैठकीत चर्चा झाली.

Local train Chance start soon everyone Thackeray government vijay vadettiwar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local train Chance start soon everyone Thackeray government vijay vadettiwar