यात्री अँपवर थेट काढा लोकल ट्रेनची तिकीट!

मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत यात्री अँपवर ट्रेनचे लाईव्ह लोकेश आणि शेअरची सुविधा सुरू केल्यानंतर आता यात्री अँपवर प्रवाशांना लोकलचे तिकीट सुविधा सुरू करण्यात आले आहे.
Rail Yatri APp
Rail Yatri APpSakal
Summary

मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत यात्री अँपवर ट्रेनचे लाईव्ह लोकेश आणि शेअरची सुविधा सुरू केल्यानंतर आता यात्री अँपवर प्रवाशांना लोकलचे तिकीट सुविधा सुरू करण्यात आले आहे.

मुंबई - मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत यात्री अँपवर ट्रेनचे लाईव्ह लोकेश आणि शेअरची सुविधा सुरू केल्यानंतर आता यात्री अँपवर प्रवाशांना लोकलचे तिकीट सुविधा सुरू करण्यात आले आहे. रेल्वेने नुकताच यात्री अँपमध्ये यूटीएस लिंकच्या तरतुदीसह अपडेट केले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना थेट यात्री अँपवरून लोकल ट्रेनचे तिकीट काढता येणार आहे.

उपनगरी लोकल गाड्या वेळापत्रक आणि लाइव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दोन वर्षांपूर्वी यात्री अँप विकसित केले होते. मात्र, या अँपवर फक्त रेल्वेचे वेळापत्रक दिसत होते. लोकल गाड्यांच्या रिअल टाईम ट्रॅकिंग सुविधा सुरु झाली नव्हती. त्यामुळे यात्री अँप वापरणाऱ्या प्रवाशांना लोकल गाड्यांचे रियल टाईम स्टेटस कळत नव्हते.

१३ जुलै २०२२ पासून मध्य रेल्वेने यात्री अँपवरही सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आणि सुलभ प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यात मदत झाली आहे. तसेच आता यात्री अँप युटीएस लिंकच्या तरतुदीसह अपडेट केले गेले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना थेट यात्री अँपवरून लोकल ट्रेनचे तिकीट काढता येणार आहे. ही सुविधा मुख्य मार्ग, हार्बर लाईन, ट्रान्सहार्बर मार्ग आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर मार्गाच्या लोकल ट्रेन प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com