नवी मुंबईत लॉकडाऊन वाढला; 19 जुलैपर्यंत असणार निर्बंध कायम...

सुजित गायकवाड
Saturday, 11 July 2020

नवी मुंबई महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मिसाळ यांच्या बैठकीत नवी मुंबई शहरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. 29 जूनपासून 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.

नवी मुंबई : वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे नवी मुंबई सुरू असलेला लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतला आहे. त्यामुळे 13 जुलैनंतर 19 जुलैपर्यंत नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर निर्बंध कायम राहणार आहे. 

कोरोना नियंत्रणासाठी पालिकेचा नवा फॉर्म्युला; उपनगरातील 6 प्रभागात लागू...

नवी मुंबई महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मिसाळ यांच्या बैठकीत नवी मुंबई शहरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. 29 जूनपासून 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या बाहेर फिरण्यास मनाई सोबत इतर बाबींवर निर्बंध टाकण्यात आले होते. या टाळेबंदीतून फक्त एपीएमसी मार्केट आणि एमआयडीसी वगळण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली पाठोपाठ नवी मुंबईतही 19 जुलैपर्यंत निर्बंध कायम असणार आहे.

कल्याणमध्ये कोरोना पसरण्याचा धोका; कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.... ​

लॉकडाऊननंतरही नवी मुंबईतील रुग्णवाढीचे सत्र थांबलेले नाही. उलट लॉकडाऊनच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच गेली. आधी लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत 13 जुलैला संपणार असल्याने या लॉकडाऊनमध्ये आणखीन सहा दिवसांची मुदतवाढ करून 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम केला आहे. या वाढवलेल्या लॉकडाऊनमध्ये आधीचे निर्बंध कायम राहणार असल्याचे महापालिकेतर्फे स्पष्ट केले आहे. 

मनसेचे पुन्हा खळखट्याक;  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून संताप...​

पनवेलमध्येही लॉकडाऊन वाढणार?
पनवेल महापालिकेने घेतलेला लॉकडाऊनचा कालावधी 13 जुलैला संपणार आहे. या काळात कोरोनाच्या रुग्णांची संख्या काही अंशी कमी झाल्याचा परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे 13 जुलैनंतर महापालिका हद्दीतील लॉकडाऊन पुढे वाढवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown extended upto 19th july in navi mumbai as no of patients increases