Lockdown : सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर अन् त्याचा फटका पोलिसांना

police
police

मुंबई : कोरोना रोखण्यासाठी सातत्याने एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले जात आहे, मात्र त्याचे पालन होत नाही आणि गर्दी केलेल्या लोकांना पांगवण्याची जबाबदारी पोलिसांवर येते, त्यामुळे पोलिसांचे काम जास्तीत जास्त खडतर तसेच धोकादायकही होत आहे.

मुंबईत आत्तापर्यंत जवळपास साडेसहाशे पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 93 जण त्यातून बरे झाले आहेत. कोरोनाबाधित पोलिसांची आकडेवारी बघितल्यास त्यातील सर्वाधिक बाधा दक्षिण तसेच मध्य मुंबईत झाली आहे. एकमेकांपासून सुरक्षित अंतर लोकांनी राखावे याची जबाबदारी पोलिसांवर आहे. हे काम करण्यासाठीच त्यांना लोकांनजिक जाणे भाग पडत आहे. मुंबईतील सर्वाधिक बाधा जेजे मार्ग पोलिस ठाण्यातील नियुक्त 46 जणांना बाधा झाली. त्याखालोखाल सहार पोलिस ठाणे (26) आहे. धारावी (19), वडाळा (17), पायधुणी (13), निर्मल नगर (14), वाकोला (12) येथील संख्याही लक्षणीय आहे. 

एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे पालन लोकांकडून होत नाही. ते मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांच्याच नव्हे तर इतरांच्या जीवालाही धोका होतो. गर्दी झाल्यावर पोलिसांना तिथे जावे लागते. यावेळी जास्त संपर्क येतो. स्थलांतरीतांनी रस्त्यावर गर्दी केली, त्यावेळीही त्यांना तेथून हटवताना संपर्क आला, याकडे पोलिस आधिकारी लक्ष वेधतात. केवळ सुरक्षित अंतराचे पालन केल्यामुळेच हे घडले असे नाही, तर गुन्हेगारांमुळेही पोलिसांना लागण झाली आहे. आरोपीला पकडल्यावर त्याची तपासणी होते, त्याला कोरोना झाल्याचे लक्षात येते, त्याच्यामुळे पोलिसांना लागण झाली आहे, याकडेही आधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. 

स्पेशल ब्रँचमधील आधिकारीही कोरोनापासून सुटलेले नाहीत. त्यांनाही मुंबईत नियमांचे पालन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सशस्त्र पोलिस दलातील (armed police), 134 जण बाधित आहेत, तर सुरक्षा विभागातील (protection and security department) 20, गुन्हे अन्वेषण विभागातील (crime branch) 11, शीघ्र कृती दलातील (quick responce teams) 12 आणि वाहतूक विभागातील (motor transport department) 16 जणांना बांधा झाली आहे.

Lockdown: The final blow to the police on the social distance

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com