लॉकडाऊनचा डोक्याला ताप! अनेक कुटुंबांना डिप्रेशनचा विळखा; वाचा कारणे आणि त्यावरील उपाय

भाग्यश्री भुवड
Monday, 10 August 2020

कोरोना महामारीमुळे देशभरात गेल्या 4 महिन्यांपासून अधिक काळ लॉकडाऊन सुरु आहे. अश्यातच घरी बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्याला ताप झाला आहे. मानसोपचार तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुंबईच्या कुटुंबातील प्रत्येक वयोगटातील डिप्रेशनचे रुग्ण त्यांच्या उपचारांसाठी दाखल होत आहेत.

 

मुंबई - कोरोना महामारीमुळे देशभरात गेल्या 4 महिन्यांपासून अधिक काळ लॉकडाऊन सुरु आहे. अश्यातच घरी बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्याला ताप झाला आहे. मानसोपचार तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुंबईच्या कुटुंबातील प्रत्येक वयोगटातील डिप्रेशनचे रुग्ण त्यांच्या उपचारांसाठी दाखल होत आहेत. लहान मुले, तरुण किंवा वयस्कर मंडळी असो आता असा कोणताच वयोगट नाही जो डिप्रेशन मध्ये नाही. प्रत्यक जण कोरोना आणि लॉकडाऊनमूळे डिप्रेशन मध्ये गेला आहे. त्यामूळे अश्या रुग्णांच्या संख्येत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. 

Photo Feature : फुलपाखरांच्या विश्वात....

लॉकडाऊनमध्ये सतत तासंतास घरी राहिल्यामुळे लोकांच्या डोक्यावर गंभीर परिणाम झाला आहे. शिवाय, या परिस्थितीत अनेकांनी आपला जॉब गमावण्याच्या कारणामूळे ही अनेक जण मानसिक तणावाखाली आहेत. त्याचबरोबर, कुटुंबात सर्व सतत एकत्र राहिल्याने न पटण्याच्या कारणावरुन घरात वाद होण्याचे प्रमाण ही वाढले आहे. स्वतःचा वयक्तिक वेळ मिळत नसल्याने ही लोकांमध्ये चिडचिड वाढली आहे. डिप्रेशन वाढवण्या मागे कोरोनाची भीती हे एक मुख्य कारण असू शकेल असं ही मानसोपचार तज्ञ सांगतात.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचाही प्रस्ताव; वाचा आताची सर्वात मोठी अपडेट

तसंच, झोप न येण्याच्या समस्येमूळेही डिप्रेशन येऊ शकते, सातत्याने ऑनलाईन गेम्स खेळल्यामुळे ही मानसिक तणाव वाढल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे, सध्या लोक मानसोपचार तज्ञांची मदत घेत आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत मुंबईत 25 ते 30 टक्के रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ज्यात लहान मुले, तरुण, महिला आणि वयस्कर व्यक्तींचा समावेश आहे.

 

मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनच्या आधी जास्त प्रमाणात मोबाईल फोन वर गेम खेळणारी मुलं आणि तरुण उपचारांसाठी येत होते. मात्र, आता लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वच मानसिक तणावाखाली आहेत. यावर उपाय म्हणून प्रत्येकाने आपल्या झोपण्याच्या आणि जागण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत. शिवाय, दररोज व्यायाम, डाएट आणि शरीराची हालचाल ठेवली पाहिजे. ज्यातून त्यांना सकारात्मक उर्जा मिळेल.

डॉ. सागर मुंदडा, मानसोपचार तज्ञ

०---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown headaches, depression for many families; Read the causes and solutions