लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचे आदेश

lockdown
lockdown

रोहा : लॉकडाऊननंतर मुंबई, पुणे, सुरत आदी शहरांतून अनेक नोकरदार आणि व्यावसायिक रायगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी आले आहेत. त्यांची तपासणी करून "होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे. मात्र, अनेक जण नियमांची पायमल्ली करून बेजबाबदारपणे घराबाहेर फिरताना दिसतात. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

आवश्‍यकता असल्यास त्यांना सक्तीच्या "इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन'मध्ये पाठवावे, त्याचबरोबर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि कलम 144 अन्वये कडक कारवाई करावी, असे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com