लोकसभा निवडणुकीपूर्वी उल्हासनगर काँग्रेसची नवी कार्यकारिणी

दिनेश गोगी
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

उल्हासनगर - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच प्रदेश काँग्रेसने उल्हासनगरातील काँग्रेसची नवी कार्यकारिणी निवडली आहे. राधाचारण करोतीया यांची उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी तर मोहन साधवानी यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

डॉ.जयराज लुल्ला हे अनेक वर्षे उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्ष पदावर होते. आपण काँग्रेस सोबतच आहोत. मात्र अनेक वर्षे अध्यक्षाचा पदभार हाताळल्याने आता नव्या चेहऱ्यांना पसंती द्यावी अशी आग्रही मागणी डॉ.जयराम लुल्ला यांनी केली. त्यानंतर वाल्मिक समाजाचे नेतृत्व व काँग्रेसच्या माजी महापौर मालती करोतीया यांचे पती राधाचारण करोतीया यांची जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. तसेच प्रदेश पदाधिकारी माजी उपमहापौर जया साधवानी यांचे पती माजी नगरसेवक मोहन साधवानी यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार सरचिटणीस ऍड.गणेश पाटील यांनी राधाचारण करोतीया, मोहन साधवानी यांना नियुक्तीपत्र दिले. याप्रसंगी डॉ.जयराम लुल्ला, जया साधवानी उपस्थित होते.

Web Title: Before the Lok Sabha elections, the new executive committee of Ulhasnagar Congress