
Mumbai BEST Bus : बेस्ट खरेदी करणार ५० मेगावॉट वीज; लोकेश चंद्र
मुंबई : एप्रिल मे या दोन उन्हाळ्याच्या महिन्यांत विजेचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने ५० मेगावॉट वीज खरेदीचा निर्णय घेतल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
बेस्टचे मुंबईत १० लाख ४७ हजार वीज ग्राहक आहेत. उन्हाळ्यात विजेच्या मागणीत वाढ होते, यामुळे पुढील १ एप्रिल ते जूनपर्यंत असे तीन महिन्यांसाठी अतिरिक्त वीज खरेदीचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. सध्या टाटा पॉवर कंपनीकडून ७८० मेगावॉट वीज पुरवठा होतो. परंतु एप्रिल मे महिन्यात वीजेच्या मागणीत वाढ होत असल्याने अतिरिक्त ५० मेगावॉट वीज खरेदी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
यंदा उन्हाळ्यात ४० अंश सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात मुंबईकरांकडून वीजेचा अधिक वापर होणार आहे. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात मुंबईकरांना वीजेचा तुटवडा भासू नये यासाठी अतिरिक्त ५० मेगावॉट वीज खरेदी करण्यात येणार असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.