टिळकांच्या कार्यातील शौर्य मुलांपर्यंत पोचवा : वझे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

लोकमान्य टिळकांच्या कार्यातील पराक्रम, शौर्य, तेजस्विता लहान मुलांपर्यंत पोचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते चंद्रशेखर वझे यांनी केले.  येथील ग्रंथाभिसरण मंडळ सार्वजनिक वाचनालयातर्फे चंद्रशेखर वझे यांचे व्याख्यान वाचनालयाच्या श्रीराम देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

अंबरनाथ : लोकमान्य टिळकांच्या कार्यातील पराक्रम, शौर्य, तेजस्विता लहान मुलांपर्यंत पोचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते चंद्रशेखर वझे यांनी केले.  येथील ग्रंथाभिसरण मंडळ सार्वजनिक वाचनालयातर्फे चंद्रशेखर वझे यांचे व्याख्यान वाचनालयाच्या श्रीराम देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

त्यावेळी मार्गदर्शन करताना वझे यांनी वरील प्रतिपादन केले. वाचनालयाचे अध्यक्ष प्रवीण मथुरे यांनी स्वागत, आश्विनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर मिलिंद आमडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे माजी अध्यक्ष सी. ए. हेमंत गोगटे, किरण जोशी, रवींद्र हरहरे, अनंत कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लोकमान्य टिळक हे सर्व क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी अभ्यास करतांना स्वतःची प्रकृती शरीर स्वास्थ्य उत्तम असावे यासाठी टिळकांनी ऐन शिकण्याच्या वयात एक वर्ष शाळेत न जाता सातत्याने व्यायाम करून आपले शरीर पिळदार केले, हे आताच्या लहान मुलांना समजावून सांगितले पाहिजे. लोकमान्य टिळक यांचे पराक्रम, शौर्य, तपश्चर्या लहान मुलांना सांगणे आवश्यक असल्याचे चंद्रशेखर वझे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lokmanya tilak nation contrubution is very importatnt