Loksabha 2019 : प्रशांत किशोर यांनी केले शिवसेनेला मार्गदर्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई - निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी "मातोश्री'वर आज शिरूर, ठाणे, रायगड आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्याचे समजते.

मुंबई - निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी "मातोश्री'वर आज शिरूर, ठाणे, रायगड आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्याचे समजते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनीतिकार आणि तज्ज्ञ म्हणून काम केले होते. तेव्हापासून त्यांचा राजकीय वर्तुळात वावर सुरू होता. गेल्या महिन्यात प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत शिवसेनेसाठी निवडणूक रणनीती ठरविण्याबरोबर निवडणुका जिंकण्याचे तंत्र शिवसेना नेत्यांना शिकवण्याची इच्छा त्यांनी व्यक्‍त केली होती. त्यांच्या भेटीनंतर शिवसेना-भाजप युती आकारास आली होती. आज पुन्हा प्रशांत किशोर यांनी "मातोश्री'ला भेट दिल्याचे सांगण्यात आले. या वेळी त्यांनी शिवसेनेच्या कोट्यातील शिरूर, ठाणे, रायगड आणि नाशिक मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्याचे समजते.

Web Title: Loksabha Election 2019 Prashant Kishor Shivsena Guidance