दक्षिण मध्य मुंबईतून आठवले लढणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मुंबई - आगामी लोकसभेची चाहूल सुरू झालेली असतानाच रामदास आठवलेंनी दक्षिण मध्य मुंबईतून स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आठवलेंचा हा निर्णय शिवसेनेला थेट आव्हान असल्याचे मानले जात आहे.

पुढील लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मध्य मुंबईत भाजप-आरपीआय युतीचा उमेदवार म्हणून रामदास आठवले असतील. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे, त्यांनीही सहकार्याचे आश्वासन दिल्याचे आठवले यांनी सांगितले.

शिवसेना-भाजप युती झाली नाही तर, उद्धव ठाकरेंना भेटून दक्षिण मध्य मुंबईत उमेदवार देऊ नये, अशी विनंती करणार असल्याचे आठवले म्हणाले.

Web Title: loksabha election ramdas athawale south center mumbai politics