...तर शरद पवारांसमोर उभा राहीन - जानकर

Mahadev Jankar
Mahadev Jankar

मुंबई - भारतीय जनता पक्षाने आदेश दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढातून आव्हान देण्याची तयारी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दाखवली आहे. पत्रकारांशी गुरुवारी बोलताना ते म्हणाले, ‘‘आपला पक्ष भाजपचा घटक पक्ष म्हणूनच निवडणुकांना सामोरा जाईल पण ‘कमळ’ या चिन्हावर मात्र निवडणुका लढवल्या जाणार नाहीत.’’ 

राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्याने आव्हान देणाऱ्या जानकर यांनी ‘शरद पवार यांचा करीष्मा संपला आहे. आता त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरायला नको,’ असे विधानही केले. बारामती, माढा या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लोकसभा मतदारसंघांबरोबरच परभणी, हिंगोली, अमरावती आणि ईशान्य मुंबई या अन्य चार जागांवरही राष्ट्रीय समाज पक्षाने दावा केला आहे. घटक पक्षांना सामावून घेण्याचे धोरण लक्षात घेता भाजप ही मागणी पूर्ण करेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली आहे.२४ फेब्रुवारी रोजी मुंबईत राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा होणार आहे.

भाजपने संधी दिल्यास आपण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधातही निवडणूक लढवण्यास तयार आहोत
- महादेव जानकर, अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com