लांब पल्ल्याच्या गाड्यांत 10 टक्के सवलतीत तिकीट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - लांब पल्ल्याच्या मेल-एक्‍स्प्रेसमधील आसने शिल्लक राहत असल्याने रेल्वे मंत्रालयाने तूट भरून काढण्यासाठी प्रवाशांना 10 टक्के सूट पश्‍चिम रेल्वेवर जाहीर केली आहे. राजधानी, शताब्दी, दुरांतो गाड्यांतील तत्काळ कोट्यात आयत्या वेळी तिकिटांचे आरक्षण करणाऱ्यांना ही सवलत आहे. प्रायोगिक तत्त्वावर गुरुवारपासून ही सवलत देण्यास सुरुवात झाली आहे. 31 मे 2017 पर्यंत ती सुरू राहील.

रेल्वे मंत्रालयाने "राजधानी'सह काही गाड्यांत विमानसेवेप्रमाणे मागणीनुसार तिकिटांच्या दरात वाढ करण्याची प्रणाली अवलंबली आहे. पण याला कमी प्रतिसाद मिळत असल्याने काही आसने रिकामी राहत असल्याचे रेल्वेच्या लक्षात आले. त्यावर मात करण्यासाठी रेल्वेने ही सवलतीची योजना आखली आहे. मेल-एक्‍स्प्रेसमध्ये ठराविक मुदतीत तिकिटांचे आरक्षण केल्यानंतर प्रवाशांची अंतिम यादी तयार केली जाते. त्यानंतर शेवटच्या क्षणी आरक्षण करणाऱ्या प्रवाशांकडून मूळ तिकिटाच्या दीडपट रक्कम आकारली जाते. आता गाड्यांमध्ये जागा शिल्लक असल्यास आरक्षण तक्ता झाल्यावर प्रवाशाने तिकीट घेतल्यास 10 टक्के सवलत दिली जाणार आहे..

Web Title: Long-distance trains, 10 per cent of the facilities ticket