खुटखाडी पुलाच्या नुतनीकरण प्रकरणी लक्ष घालू - श्रीनिवास वनगा

अच्युत  पाटील
शनिवार, 9 जून 2018

बोर्डी - बोर्डी-घोलवड गावाच्या सिमेवरील खुटखाडी वरील पुलाचे नुतनीकरण प्रकरणी अग्रक्रमाने लक्ष घालण्यात येईल अशी हमी शिवसेनेचे पालघर जिल्हा संघटक श्रीनिवास वनगा यांनी परिसरातील कार्यकर्त्यांना दिली.

बोर्डी - बोर्डी-घोलवड गावाच्या सिमेवरील खुटखाडी वरील पुलाचे नुतनीकरण प्रकरणी अग्रक्रमाने लक्ष घालण्यात येईल अशी हमी शिवसेनेचे पालघर जिल्हा संघटक श्रीनिवास वनगा यांनी परिसरातील कार्यकर्त्यांना दिली.

शुक्रवार दिनांक 8 जून रोजी सकाळ दैनिक पालघर टुडेच्या अंकात पुल,रस्त्याची रखडपट्टी या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन श्रीनिवास वनगा यांनी बोर्डी येथील खुटखाडी पुलाची पाहणी केली. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विजय म्हात्रे,घोलवड ग्रामपंचायत चे माजी सदस्य प्रकाशअमृते,महेश मोठे,यतिन सावे, सुहास पाटील, उद्योजक प्रभाकर राऊत, रामपूर चे सदस्य जयंत माच्छी,गणेश मळवलकर,आदी मान्यवर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डहाणू-बोर्डी मुख्य मार्गावरील खुटखाडी पुल धोकादायक झाला आहे. मागील पाच वर्षापासून या पुलाचे नुतनीकरण प्रक्रिया लालफितीत अडकून पडली आहे. डहाणू पारनाका ते झाई पर्यंत पंधरा किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी तीन कोटी ऐशी लाख रुपये निधी मंजुरी असतानाही पोटनिवडणूक आचार सहिता लागल्याचे कारणे दाखवून दोन्ही कामे पावसाळ्यापूर्वी पुर्ण न केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

या विषयावर सकाळ दैनिकात बातमी प्रसिद्ध झाल्यावर श्रीनिवास वनगा यांनी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन खुटखाडी पुल नुतनीकरण व डहाणू,बोर्डी मार्गाच्या कामात अग्रक्रमाने लक्ष घलण्याची हमी कार्यकर्त्यांना दिली.

Web Title: Look into the renewal of the bridge - Srinivas Vanaga