बळीराजाचे कष्ट वाया; संघर्ष सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

बोर्डी परिसरात गुरुवारी (ता.७) पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने उरले-सुरले पीकही पाण्यात गेले आहे. सहकारी सोसायट्या आणि बॅंकांकडून कर्ज घेऊन शेतीत चार महिने केलेले कष्ट वाया गेले असून सर्व काही संपले आहे. तसेच पावसामुळे कुजलेल्या धान्याला दुर्गंधी सुटली असून गुरांसाठी लागणारी पावळीही कुजली आहे. त्यामुळे वरुण राजाला आता उदरनिर्वाहासाठी संघर्ष करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. 

बोर्डी ः बोर्डी परिसरात गुरुवारी (ता.७) पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने उरले-सुरले पीकही पाण्यात गेले आहे. सहकारी सोसायट्या आणि बॅंकांकडून कर्ज घेऊन शेतीत चार महिने केलेले कष्ट वाया गेले असून सर्व काही संपले आहे. तसेच पावसामुळे कुजलेल्या धान्याला दुर्गंधी सुटली असून गुरांसाठी लागणारी पावळीही कुजली आहे. त्यामुळे वरुण राजाला आता उदरनिर्वाहासाठी संघर्ष करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. 

भात कापणीच्या काळात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतीची कामे काही काळ खोळंबली होती. दिवाळीनंतर कापणीच्या कामाला वेग आला असतानाच अचानक पुन्हा तुफान पाऊस पडला. या पावसात हजारो हेक्‍टर भात शेती पाण्यात बुडाली. यातून जेमतेम सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला, अशाही परिस्थितीत जीवाचा आटापिटा करून बळिराजाने उरलेसुरले धान्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला; मात्र कोपलेल्या निसर्गाने शेतकऱ्याच्या परिश्रमांवर पाणी फिरवले आहे.

गुरुवारी (ता.७) आणि शुक्रवारी (ता.८) पहाटे ३ वाजल्यापासून ३७.५० मि.मी. पाऊस परिसरात झाला. या पावसाचे पाणी साठवलेल्या धान्याच्या उडव्यात घुसल्याने धान्य व पावळी कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने दुर्गंधी सुटली आहे. धान्यातून व पावलीतून दोन पैसे मिळतील, ही आशाही फोल ठरली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of paddy fields due to rainfall in Bordi