डाटाचोरीमुळे कंपनीला 65 कोटींचा तोटा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

मुंबई - चर्चगेट येथील आरएमसीपीएल कंपनीचा डाटा चोरी करून तीन कंपन्यांना पुरवल्याच्या आरोपाखाली मरिन ड्राईव्ह पोलिसांनी 55 वर्षांच्या अधिकाऱ्याला अटक केली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कृत्यामुळे कंपनीला सुमारे 65 कोटी रुपयांचा तोटा झाला असून, आरोपीने त्याच्या पत्नीच्याच कंपनीला 91 लाख रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

राजेश सैगल (रा. दहिसर) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधानातील कलम 420, 409, 420 व 34 व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यातील कलम 66 व 66 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरएमसीपीएल ही कंपनी विशिष्ट रसायने, उपकरणे, औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त साधनसामग्री, पाणी शुद्धीकरण, तेल शुद्धीकरणाशी संबंधित सामग्रीची निर्मिती करते. या उत्पादनांचे फॉर्म्युले व प्रक्रिया तसेच किमतीबाबत कंपनीकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत होती. ही सर्व माहिती संगणक प्रणातील साठवली जात असे. 

सैगल या कंपनीत 2013 पासून विक्री व पणन विभागात उपाध्यक्ष म्हणून काम करत होता. त्याने 2013 मध्ये मे. टेट्राकेम या कंपनीला उत्तर भारतातील व्यवसाय विस्तारासाठी एजंट म्हणून नेमण्याचे सुचवले. या कंपनीला 2014 ते 2017 या कालावधीत 91 लाख 68 हजार रुपये देण्यात आले. प्रत्यक्षात या कंपनीने आरएमसीपीएल कंपनीच्या व्यवसाय विस्तारासाठी कोणताही खर्च केला नव्हता. आरोपीने त्यांच्याकडे सोपवलेला कंपनीचा गोपनीय डाटा तीन कंपन्या व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना पुरवल्याचे अंतर्गत तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे कंपनीची विक्री 65 कोटींनी कमी होऊन तोटा झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी सैगल याला मंगळवारी अटक केली. 

Web Title: Loss of Rs. 65 crores due to data loss