गणेशपुरी येथे झाड़ कोसळुन घराचे नुकसान ; महिला बेघर

दीपक हीरे
रविवार, 10 जून 2018

वज्रेश्वरी : अतिवृष्टि पावसात गणेशपुरी येथील एका महिलेच्या घरावर कुटुंबातील सर्वजन झोपेत असताना येथील भीमेश्वर सद्गुगुरु नित्यानंद संस्थानच्या परिसरात असलेले मोठे निलगिरिचे वृक्ष कोलमडून मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेशपुरी शाखा अध्यक्ष दीपक पुजारी यानी सदर गरीब महिलेला भीमेश्वर सद्गुगुरु नित्यानंद संस्थानने त्यांच्या बेजबाबदारपणामुळे बेघर व्हावे लागले असून त्याचे घर बांधून द्यावे अशी मागणी करून याची दखल न घेतल्यास बेघर महिलेस सह उपोषणचा इशारा दिला आहे.

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे गेले दोन दिवस वादली वारे सह मुसळधार पाऊस पड़त आहे. त्यामुळे काल झालेल्या अतिवृष्टि पाउसामुळे येथे राहणारे तारा मोर यांच्या घरावर पहाटेच्या सुमारास सर्व जण झोपेत असताना निलगिरिचे मोठा वृक्ष कोलमडून घराचे पत्रे, भिंति, घरातील सामान मोडले आहे. सदर वृक्ष नित्यानंद संस्थानचे मुझिएम परिसरातले असून कोलमडने आधी तक्रारदार तारा मोर या महिलेने 25 मेला वारंवार विनंती अर्ज केले मात्र त्याची दखल संस्थानने  घेतली नाही, त्यामुळे आम्ही बेघर झाल्याची तक्रार या महिलेने गणेशपुरी पोलीस ठाणे येथे केली आहे. संस्थानच्या या बेजबादारपणामुळे येथील ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

वेधशाऴेने अतिवृष्टिचा इशारा देऊनही बेजबाबदारपणा

"9 ते 11 रोजी अतिवृष्टिचा इशारा वेधशाऴेने दिला होता त्या अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागला सुट्टी रद्द करून मुख्यालय थांबण्याचे आदेश जारी केले होते. असे असताना येथील एवढी मोठी घटना घडून देखील येथील तलाठी, सर्कल यांचा फोन स्विच ऑफ असून कुणीही महसूल विभाग कर्मचारी ठिकाण्यावर नसल्याने येथील पंचनामा साठी महिला वणवण फिरत आहे".

Web Title: lost home due to tree fall in ganeshpuri ; Female homeless