नारीवलीचे धरण चोरीला गेल्याची मुरबाडमधील नेटकऱ्यांमध्ये चर्चा

मुरलीधर दळवी 
बुधवार, 28 मार्च 2018

मुरबाड  (ठाणे) : मुरबाड तालुक्यातील नारीवली गावचे धरण चोरीला गेले आहे की काय? अशी चर्चा साध्य व्हॉट्सअॅप वर रंगली आहे, याला कारण ठरले ते तहसीलदार कार्यालयात लावलेला फलक.. मुरबाड तहसीलदार कार्यालयात मुरबाड तालुक्याच्या माहितीमध्ये मुरबाड तालुक्यातीक प्रमुख धरणाची नावे दिली आहेत त्या मध्ये बारवी, पाडाळे, म्हाडस, सोनावळे, शिरवली व खांडपे या धरणांबरोबरच नारीवली धरणाचे नाव लिहिले आहे.

या फलकाचा फोटो नारीवली गावच्या प्रकाश विशे यांनी काढुन व्हॉट्सअॅप वर टाकला व नारीवली येथे धरण आहे काय त्याची नोंद तहसील कार्यालयात आहे अशी विचारणा केली त्यावर दिगंबर विशे यांनी धरण चोरीला तर गेले नाही ना, अशी प्रतिक्रिया दिली आणि धरण गायब झाले का याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी जोर धरू लागली. 

नेटकऱ्यांच्या या चर्चे वरून पत्रकारांनी मुरबाडचे तहसीलदार कार्यालय गाठले त्या वेळी फलकावरील नाव सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीने टाकले आहे. नारीवलीला धरण झालेले नाही असा खुलासा तहसीलदार कार्यालयातून करण्यात आला व फलकावरून नारीवली धरणाचे नाव पुसून टाकण्याचे आश्वासन देण्यात आले. 

या बाबत पत्रकारांनी अधिक चौकशी केली असता नारीवली धरणाचा सर्व्हे माजी आमदार गोटीराम पवार यांच्या काळात झाला होता, परंतु हे धरण भीमाशंकर अभयारण्याच्या क्षेत्रात असल्याने त्यावेळी धरणाच्या कामास अंतिम मंजुरी मिळाली नसल्याचे माजी आमदार गोटीराम पवार यांनी सांगितले.

2009 नंतर या धरणाचा विषय थंडावला मात्र 2018 साल उजाडले तरी या धारणाबाबत काहीही हालचाल झाली नाही परंतु एका जागृत नागरिकाने तहसीलदार कार्यालयातील फलकामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या नातवंडांना तरी हे धरण झालेले पाहायला मिळेल की नाही असा निराशावादी सूर व्हॉट्सअॅप वरील चर्चेत दिसून येत आहे.

Web Title: lost of narivali dam news viral on whatsap