राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्याचे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये पडसाद

bhagat singh koshyari
bhagat singh koshyariSakal media

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) अधिसभेला (सिनेट) (senate) आजपासून (ता. १५) विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सुरुवात झाली. अधिसभेच्या सुरुवातीलाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा (controversial statement) निषेध करण्यात आला. या वेळी राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

bhagat singh koshyari
अवैध मासेमारी रोखण्यासाठी कायदा कडक करणार; अस्लम शेख यांची घोषणा

अधिसभेची सुरुवात होताच युवासेनेच्या सदस्यांनी उभे राहून राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. महादेव जगताप, वैभव थोरात, प्रवीण पाटकर, राजन कोळंबेकर, शीतल देवरूखकर शेठ, डॉ. धनराज कोहचाडे आदींनी जोरदार घोषणाबाजी केली.

या वेळी राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांनी हा विषय येथे बोलणे योग्य नसल्याचा दावा केला. त्यावर युवा सेनेचे सदस्य पुन्हा संतप्त झाले, त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com