प्रेमास नकार दिल्याने दरवाजावर थुंकायचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

प्रेमाच्या मागणीला नकार दिल्यानंतर पीडित तरुणीच्या दरवाजावर येऊन थुंकणाऱ्या दक्षिण मुंबईतील 24 वर्षीय तरुणाला डोंगरी पोलिसांनी अटक केली. आरोपीने समाजमाध्यमांवर पीडित मुलगी आणि तिच्या आईला शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

मुंबई - प्रेमाच्या मागणीला नकार दिल्यानंतर पीडित तरुणीच्या दरवाजावर येऊन थुंकणाऱ्या दक्षिण मुंबईतील 24 वर्षीय तरुणाला डोंगरी पोलिसांनी अटक केली. आरोपीने समाजमाध्यमांवर पीडित मुलगी आणि तिच्या आईला शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

डोंगरी येथील रहिवासी असलेली 19 वर्षीय तक्रारदार तरुणी दक्षिण मुंबईतील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिच्या तक्रारीनुसार प्रभादेवी येथे राहणारा 24 वर्षीय तरुण डिसेंबर, 2018 पासून तरुणीचा पाठलाग करत असे. एक दिवस त्याने तरुणीला रस्त्यात अडवून तिचा हात धरला व तिच्याशी बोलायचे असल्याचे सांगितले. तिने नकार दिला असता तरुणाला राग आला. त्यानंतर तो नेहमी या तरुणीच्या घरी येऊन दरवाजासमोर थुंकू लागला. एकदा या पीडित मुलीच्या वडिलांनी तरुणाला पकडले व त्याच्या वडिलांना सगळा गैरप्रकार सांगितला. मात्र त्यानंतरही तो थांबला नाही. त्याने समाजमाध्यमांवरही तिला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवत आक्षेपार्ह बोलण्यास सुरवात केली. अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक केली.

Web Title: Lover Crime Police