याच महिन्यात परतीच्या पावसाला सुरवात होणार, स्कायमेटची माहिती

सुमित बागुल
Friday, 18 September 2020

स्कायमेट या हवामानाबाबत अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्थेच्या माहितीप्रमाणे बंगालच्या उपसागरात म्यानमारकडून कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याची माहिती दिली आहे.

मुंबई : गेले काही दिवस मुंबईत पावसाचा जोर कमी झालाय. अशात यंदाच्या मोसमात सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारताच्या विविध राज्यांच्या विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. हवामानाबाबत अंदाज व्यक्त करणाऱ्या स्कायमेट या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.  

स्कायमेट या हवामानाबाबत अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्थेच्या माहितीप्रमाणे बंगालच्या उपसागरात म्यानमारकडून कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याची माहिती दिली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

महत्त्वाची बातमी - म्हणून अजित पवारांनी घेतला यु टर्न आणि पुन्हा...

सप्टेंबर महिन्याच्या २१ तारखेच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या भागात प्रवेश करेल. त्यामुळे जमिनीवर प्रवेश केलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशावर राहील असंही स्कायमेट ने म्हटलंय. दरम्यान, या महिन्याच्या २४ तारखेपर्यंत हे क्षेत्र मध्यप्रदेशावर जेंव्हा असेल तेंव्हा तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये कोसळधार बारसण्याची शक्यता वर्तवली गेलीये. तर राजस्थानात आणि दिल्लीतही ढगाळ वातावरण राहील.

low pressure belt in bay of bangal heavy showers expected in maharashtra

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: low pressure belt in bay of bangal heavy showers expected in maharashtra