esakal | गंभीर! आयसोलेशन केंद्रातील रुग्ण, डॉक्टर, परिचारिकांनाच निकृष्ट दर्जाचे जेवण
sakal

बोलून बातमी शोधा

गंभीर! आयसोलेशन केंद्रातील रुग्ण, डॉक्टर, परिचारिकांनाच निकृष्ट दर्जाचे जेवण

क्वारंटाईन केंद्रामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारीनंतर आयसोलेशन सेंटरमधील रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिका यांना दिल्ली दरबार या प्रसिद्ध हॉटेलमधून जेवण पुरवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. पण, गेले काही दिवस या हॉटेलमध्ये जेवणही निकृष्ट दर्जाचे येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्ण, कर्मचारी आणि डॉक्टरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गंभीर! आयसोलेशन केंद्रातील रुग्ण, डॉक्टर, परिचारिकांनाच निकृष्ट दर्जाचे जेवण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्वारंटाईन केंद्रामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारीनंतर आयसोलेशन सेंटरमधील रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिका यांना दिल्ली दरबार या प्रसिद्ध हॉटेलमधून जेवण पुरवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. पण, गेले काही दिवस या हॉटेलमध्ये जेवणही निकृष्ट दर्जाचे येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्ण, कर्मचारी आणि डॉक्टरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईमध्ये सापडणाऱ्या संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था पालिकेने विविध हॉस्पिटलमध्ये केली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष आयसोलेशन सेंटर काही हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आले आहेत. या आयसोलेशन सेंटरमधील रुग्णांसह डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांना मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल दिल्ली दरबारमधून जेवण मागवण्यात येत आहे. सुरुवातीला उत्तम दर्जाचे येत असलेल्या जेवणाचा दर्जा काही दिवसांपासून खालावला असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण त्यांना मिळत आहे. काही वेळेला पुलावच्या नावाखाली फक्त भातच रुग्णांसह सर्वांना देण्यात येत आहे. त्यासोबत डाळ, भाजी किंवा रायता असे कोणतेच पदार्थ देण्यात येत नसल्याने रुग्ण, डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना नुसताच भात खावा लागत आहे. यामध्ये मधुमेहाच्या रुग्णांनाही नुसताच भात देण्यात येत आहे. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांना कोरोनाची लागण होत असल्याची प्रकरणे समोर येत असताना पालिकेकडून डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. आम्हाला उत्तम दर्जाचे जेवण मिळाल्यास आमची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होईल, मात्र, निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्यास आमचे आरोग्य खालावून रोग प्रतिकरकशक्ती कमी होऊन आम्हाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले. 


परिचारकांनाही नित्कृष्ट जेवण - 

ताज हॉटेलमधून पुरवण्यात येणार्या जेवणावरही शंका उपस्थित करण्यात येत आहे. डॉक्टरांना देणार्या जेवणाच्या तुलनेत परिचारकांना नित्कृष्ट दर्जाचे जेवण दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आधी चांगले जेवण दिले जात होते. पण, आता जेवणाचा दर्जा खालावला असल्याचा आरोपही परिचारिका करतात.

Low quality meals for Isolation Center patients and doctors nurses

loading image