लोअर परळ पुलावर जुंपली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

मुंबई  - लोअर परळ पुलाच्या पाहणी दौऱ्यात गुरुवारी शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले. या दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने केला. पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण वेळीच शांत केले. 

वरळी भागातील शिवसेना आमदार सुनील शिंदे आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी लोअर परळ स्थानकात सकाळी रेल्वे, पालिका अधिकाऱ्यांसह पुलाच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना धक्काबुक्की-शिवीगाळ केल्याचे समजते. वाट अरुंद असल्यामुळे ही धक्काबुक्की झाली. हा पूल 24 जुलैपासून वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. 

मनसेचे धुरी म्हणाले की, पूल बंद करताना स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला विश्‍वासात घेतले पाहिजे. पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. आमचे कोणाशीही वैर नाही. आयटी पार्क केला तेव्हा उड्डाणपुलाचा विचार केला नव्हता का, असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी विचारला. आमदार शिंदे यांनी सांगितले की, आम्ही पाहणी करण्यासाठी आलो होतो; परंतु काही लोक पक्षीय राजकारण करत होते. सर्व राजकीय पक्षांनी मिळून हा प्रश्‍न सोडवला पाहिजे. 

पुलाबाबत पूर्वकल्पना असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी हा प्रश्‍न सोडवू शकले नाहीत. त्यांना हाताशी धरून पूल बंद करण्याचा घाट घातला आहे. याचा आम्ही निषेध करतो. या स्थानकातून येणारी गर्दी पाहता प्रवाशांसाठी पूल सुरू करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. 
- सचिन अहिर, अध्यक्ष, मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

Web Title: lower parel bridge issue