lumpy skin disease : पशुधनाच्या वाहतुकीवर आणखी महिनाभर निर्बंध; राधाकृष्ण विखे-पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lumpy skin disease restriction movement of livestock Radhakrishna Vikhe-Patil mumbai

lumpy skin disease : पशुधनाच्या वाहतुकीवर आणखी महिनाभर निर्बंध; राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : गोधनामध्ये पसरणाऱ्या लंपी या रोगावर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी पाळीव जनावरांच्या वाहतुकीसाठी अजून एक महिना निर्बंध राखले जाणार आहेत. राज्यात पशुधनास लंपी चर्मरोगाचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम, मुंबई उपनगर आणि सातारा या जिल्ह्यांमधील लसीकरण १०० टक्के झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार राज्यात सुमारे ८०.८६ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असून बाधित पशुधनापैकी एकूण 31179 पशुधन उपचाराने बरे झाले आहेत.

"राज्य शासनाने घेतलेल्या व्यापक लसीकरण मोहिमेमुळे हा अजर आटोक्यात येत आहे. मात्र पशुधनाच्या वाहतुकीवर आणखी एक महिना निर्बंध ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," असे पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत २५२८ पशुधनाचा मृत्यू झाला असल्याचे सचिंद्र प्रताप सिंह सिंह यांनी सांगितले.