मदन शर्मा मारहाण प्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांना होऊ शकते ७ वर्षांची शिक्षा

राजू परुळेकर
Wednesday, 16 September 2020

भाजपनं पोलिस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलनं करत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. दरम्यान आता आरोपींना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईः  आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. या मारहाण प्रकरणी पोलिसांनी सहा शिवसैनिकांना अटक केली होती. मात्र त्याच दिवशी त्यांना जामीन मिळाला. आरोपींमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांचाही समावेश आहे. शिवसैनिकांना जामीन मिळाल्यानंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपनं पोलिस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलनं करत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. दरम्यान आता आरोपींना पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

निवृत्त सैन्य दलातील अधिकाऱ्याला शाखा प्रमुखांनी केलेल्या मारहाणीमुळे शिवसेना अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या मारहाणीच्या विरोधात भाजप आमदार अतुल भातखळकर, स्थानिक आमदार आणि विरोधी पक्षनेते यांनी निदर्शने केली आणि गुन्ह्याच्या कलमात बदल करीत अजामीनपान्र गुन्हा दाखल करा अशी  मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानं या मारहाण प्रकरणी अटक आणि सुटका केलेल्या सहा आरोपींच्या  भादवी कलमात बदल करण्यात आला. अखेर जामिनावर सुटलेल्या सहा आरोपींना पुन्हा 14 दिवसाची  न्यायलयीन कोठडी बोरीवली न्यायालयाने सुनावली आहे. 

स्थानिक आमदार आणि विरोधी पक्षनेते यांनी पोलिस आयुक्तलयासामोर निदर्शने करून नौदल अधिकारी शर्मा यांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल  करावा अशी मागणी करण्यात आलेली होती. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. त्यांच्यावर  भांदवी 325, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल केला होता.  

 

आतापर्यंत पोलिसांनी सहा आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांची न्यायालयातून  जामिनावर सुटका केली. मात्र नंतर पोलिसांनी मागणीनुसार सुटका झालेल्या आरोपींवर अतिरिक्त कलम भादवी 452 नमूद केल्याने जामीनपात्र गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा झाला. त्यामुळे पोलिसांनी सुटका केलेल्या सहा आरोपींना पुन्हा अटक केली. त्यांना न्यायालयाकडून 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींना रोख रक्कम 15 हजारांच्या जामिनावर सोडण्यात आलं. या गुन्ह्यात भादवी 452 हे अतिरिक्त कलम लावल्यानं आरोपींना भविष्यात 7 वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

मारहाण केलेल्या आरोपींची नावं

कमलेश चंद्रकांत कदम, वय 39 वर्षे
संजय शांताराम मांजरे, वय 52 वर्षे
राकेश राजाराम बेळणेकर, वय 31 वर्षे
प्रताप मोतीरामजी सुंदवेरा, वय 45 वर्षे
सुनिल विष्णू देसाई, वय 42 वर्षे
राकेश कृष्णा मुळीक, वय 35 वर्षे

कांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. मारहाणीत मदन शर्मा यांच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

-----------------

(संपादनः पूजा विचारे) 

Madan Sharma assault case remanded Six accused judicial custody for 14 days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madan Sharma assault case remanded Six accused judicial custody for 14 days