माजी नौदल अधिकारी मदन शर्मा भेटले राज्यपालांना; भेटीनंतर काय दिली प्रतिक्रिया, वाचा सविस्तर

पूजा विचारे
Tuesday, 15 September 2020

आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी मारहाण करण्यात आली. मदन शर्मा यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. 

मुंबईः आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी मारहाण करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चिघळलं आहे. या मारहाणीनंतर भाजपनं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोलही केला. भाजपनं आंदोलनंही केलं होतं. दरम्यान आता मदन शर्मा यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. 

या भेटीनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शर्मा म्हणाले की, आतापासून मी भाजप-आरएसएस बरोबर आहे. जेव्हा मला मारहाण केली गेली, तेव्हा त्यांनी मी भाजप-आरएसएस बरोबर असल्याचा आरोप केला. म्हणून आता मी जाहीर करतो की मी, आजपासून भाजप-आरएसएस बरोबर आहे.

कांदिवली येथे राहणारे माजी नौदल अधिकारी असलेल्या मदन शर्मा यांना घरात घुसून शिवसैनिकांनी मारहाण केली होती. या  प्रकरणी ४ शिवसैनिकांना अटक करण्यात आली आणि जामीन मिळाला आहे. यामध्ये २ शाखाप्रमुखांचा तर अन्य २ कार्यकर्त्यांचा समावेश होता. या घटनेनंतर भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला. भाजपने या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं होतं. 

आज मदन शर्मा यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आहे. 

Madan Sharma met Governor Bhagat Singh Koshyari Raj Bhavan today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madan Sharma met Governor Bhagat Singh Koshyari Raj Bhavan today