esakal | कलाकारांच्या मदतीसाठी माधुरी दीक्षितही पुढे सरसावली! चित्रपट महामंडळाला भरघोस मदत
sakal

बोलून बातमी शोधा

कलाकारांच्या मदतीसाठी माधुरी दीक्षितही पुढे सरसावली! चित्रपट महामंडळाला भरघोस मदत

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री माधुरी दीक्षित या धावून आल्या व त्यांनी अ .भा.म.चि. महामंडळाला भरघोस मदत केली आहे

कलाकारांच्या मदतीसाठी माधुरी दीक्षितही पुढे सरसावली! चित्रपट महामंडळाला भरघोस मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.  हिंदीतील मोठमोठे बॅनर्स आणि बड्या कलाकारांबरोबर तिने काम केले आहे. आपल्या अभिनय आणि दिलखेचक नृत्याने तिचे जगभरात असंख्य चाहते आहेत. अभिनय करता करता चित्रपटनिर्मितीमध्येही तिने पाऊल टाकले आणि तेथेही यशस्वी मजल मारली आहे. मराठी चित्रपटातही काम करून मराठी जनतेलाही तिने सुखद धक्का दिला आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतील कामगार तसेच तंत्रज्ञ यांना मदत करण्यासाठी ती पुढे सरसावलीआहे.

कोरोनाने मुंबईतली नोकरी गेली; चक्री वादळाने बंगालमधील घरही उद्धवस्त झाले

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला तिने ही मदत दिली आहे. सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत चाललेला आहे. त्यातच संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. कामगार आणि तंत्रज्ञ यांना काहीच काम नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.त्यांना आता मदतीची गरज आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीची पालक संस्था अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने अशा कामगारांना मदत देण्याकरिता समाजतील काही दानशूर व्यक्ती तसेच काही कलाकार यांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अभिनेता रितेश देशमुखने आर्थिक मदत केली आणि आता माधुरी दीक्षितनेही मदत केली आहे.  

मराठी सिने इंडस्ट्रीतील सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणारे कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची उपासमार होऊ नये याकरिता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने या सर्वांना आर्थिक स्वरूपाची मदत वा अन्नधान्य  किराणा कीट या स्वरुपात मदत चालू केली आहे. आतापावेतो २५०० सभासदांपर्यंत ही मदत अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक व गावोगावच्या समिती सदस्य यांच्यामार्फत पोहोचवली गेली आहे. महामंडळाची सभासद संख्या लक्षात घेऊन त्यातील गरजू सभासदांना नाव नोंदणी करण्यास सांगण्यात आले असता आतापर्यंत सहा हजारपेक्षा जास्त सभासदांनी नाव नोंदणी केली आहे. त्यांना मदत करण्यात येत आहे.

MBA CET 2020! एमबीए सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर! शशांक प्रभू राज्यात प्रथम

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री माधुरी दीक्षित या धावून आल्या व त्यांनी अ .भा.म.चि. महामंडळाला भरघोस मदत केली आहे व त्यामार्फत आपल्या व्यवसायातील कामगार, तंत्रज्ञ व कलावंतांचे दुःख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच त्यांनी इतर कलावंतांना चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहनही केले आहे. अ.भा.म.चित्रपट महामंडळातर्फे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी माधुरी दीक्षित यांचे आभार मानले आहेत.

loading image