'मग्न तळ्याकाठी' ठरले सरस!

'मग्न तळ्याकाठी' ठरले सरस!

निवेदिता सराफ, प्रशांत दामले, मांडलेकर, अमेय वाघ यांना पुरस्कार
मुंबई - 29 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिगिषा आणि अष्टविनायक (मुंबई) संस्थेच्या "मग्न तळ्याकाठी' नाटकाला सात लाख 50 हजारांचे पहिले पारितोषिक जाहीर झाले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकातून ही घोषणा केली.

अनामिका-रसिका प्रॉडक्‍शन्स (मुंबई) या संस्थेच्या "कोडमंत्र' नाटकास चार लाख 50 हजारांचे दुसरे पारितोषिक आणि सुबक (मुंबई) संस्थेच्या "अमर फोटो स्टुडिओ' नाटकास तीन लाखांचे तिसरे पारितोषिक जाहीर झाले आहे. इतर पुरस्कार विजेते, आणि कंसात नाटक व पुरस्काराची रक्‍कम अशी ः दिग्दर्शन - चंद्रकांत कुलकर्णी (मग्न तळ्याकाठी, दीड लाख रुपये), राजेश जोशी (कोडमंत्र, एक लाख), निपूण धर्माधिकारी (अमर फोटो स्टुडिओ, 50 हजार), नाट्यलेखन - मनस्विनी लता रवींद्र (अमर फोटो स्टुडिओ, एक लाख रुपये), महेश एलकुंचवार (मग्न तळ्याकाठी, 60 हजार), विजय निकम (कोडमंत्र, 40 हजार), प्रकाश योजना - रवी रसिक (मग्न तळ्याकाठी, 40 हजार), भोतेश व्यास (कोडमंत्र, 30 हजार), योगेश केळकर (किमयागार, 20 हजार), नेपथ्य - प्रसाद वालावलकर (कोडमंत्र, 40 हजार), प्रदीप मुळ्ये (मग्न तळ्याकाठी, 30 हजार), प्रदीप मुळ्ये (अमर फोटो स्टुडिओ, 20 हजार).
संगीत दिग्दर्शन - आनंद मोडक व राहुल रानडे (मग्न तळ्याकाठी, 40 हजार), सचिन जिगर, (कोडमंत्र, 30 हजार), राहुल रानडे (बंधमुक्त, 20 हजार), वेशभूषा - प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव (मग्न तळ्याकाठी, 40 हजार), कल्याणी कुलकर्णी-गुगले (अमर फोटो स्टुडिओ, 30 हजार), अजय खत्री (कोडमंत्र, 20 हजार), रंगभूषा - अभय मोहिते (अमर फोटो स्टुडिओ, 40 हजार), शरद सावंत (मग्न तळ्याकाठी, 30 हजार), संतोष पेडणेकर व हेमंत कदम (कोडमंत्र, 20 हजार).

उत्कृष्ट अभिनय (रौप्यपदक व 50 हजार रुपये) - पुरुष गटात चिन्मय मांडलेकर (मग्न तळ्याकाठी), अमेय वाघ (अमर फोटो स्टुडिओ), वैभव मांगले (मग्न तळ्याकाठी), सुव्रत जोशी (अमर फोटो स्टुडिओ), प्रशांत दामले (साखर खाल्लेला माणूस), महिला गटात मुक्ता बर्वे (कोडमंत्र), निवेदिता सराफ (मग्न तळ्याकाठी), लीना भागवत (के दिल अभी भरा नहीं), हेमांगी कवी (ती फुलराणी), इला भाटे (यू टर्न-2).

पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या स्पर्धेत दहा व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर झाले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, श्रीनिवास भणगे, चंद्रकांत मेहेंदळे, अजित सातभाई आणि सुनील देवळेकर यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com