
एक वर्षात म्हणजेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात २ लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आली.
मुंबई : मुंबईत आज मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. महाराष्ट्र सरकार हे कायम गुंतवणूकदार आणि उद्योजनसोबत खंबीरपणे उभं राहील असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि अनेक गुंतवणूकदार उपस्थित होते.
महाराष्ट्रात कोविड काळात प्रचंड मोठी गुंतवणूक आली असून आपले राज्य हे सुपर मॅग्नेटिक पॉवर असल्याचा अभिमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. विविध क्षेत्रात काम करणारे उद्योजक हे महाराष्ट्र परिवाराचे सदस्य आहेत. जग कोरोनासंकटाचा सामना करत असताना आपल्या मंडळींनी विश्वास टाकून जी गुंतवणूक केली आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आपली मंडळी बरोबर असली की हत्तींचे बळ मिळते अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाची बातमी : विधान परिषद उपसभापती पदावरील नीलम गोर्हे यांची नियुक्ती कायदेशीरच : राज्य सरकार
एक वर्षात म्हणजेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात २ लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आली. त्यातील १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक कोरोनाकाळातील आहे. महाराष्ट्राच्या या कामगिरीकडे संपूर्ण देश एक उदाहरण म्हणून बघेल, असेही उध्दव ठाकरे म्हणाले. राज्यावर विश्वास दाखवत जी गुंतवणूक येथे झाली त्याबद्दल उद्योजकांचे मनापासून आभार मानायची गरज आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्येक उद्योजकाशी एक उद्योगमित्र जोडून दिला हे अत्यंत अभिनंदनीय पाउल आहे. मंत्री, अधिकारी आणि कर्मचारी जी कामे करत आहेत याबद्दल आभार व्यक्त करत राज्य आणि देशाप्रतीची निष्ठा अत्यंत महत्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या.
महत्त्वाची बातमी : महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना BMC निवडणुकीत आमने सामने? कॉंग्रसचा स्वबळाचा नारा
2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून बोलावलं तर मी नाही कसं म्हणणार?
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणालेत की, “काही लोकांनी मला उद्घाटनाला बोलावलं. तुम्ही मला 2021, 2022 आणि 2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून बोलावलं तर मी नाही कसं म्हणणार?” असं वक्तव्य केलंय. दरम्यान हा विनोदाचा भाग आहे असं देखील त्यांनी म्हटलं.
सामंजस्य करारामध्ये खालील कंपन्यांचा समावेश :
magnetic maharashtra event in detail report what CM maharashtra spoke in this event