'महा'वादळ झालं आणखी रौद्र, या वादळामुळे महाराष्ट्रात 'हे' होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

'महा' चक्रीवादळामुळे 6 ते 8 नोव्हेंबरला पालघर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याचसोबत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, गरज असेल तरच घराबाहेर पडावं असंही पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आवाहन केलंय 

अरबी समुद्रात घोंगावत असलेलं 'महा'वादळ याची तीव्रता आणखी वाढली आहे.  या वादळाच्या प्रभावामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली आहे. 

No photo description available.

अरबी समुद्रात असलेले हे वादळ 7 नोव्हेंबर पर्यंत दरम्यान दिव ते गुजरातच्या पोरबंदर दरम्यानच्या किनाऱ्यांवर धडकण्याची शक्‍यता ते थेट मध्य प्रदेशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. या वादळामुळे पुढील आठवडभर अरबी समुद्र खवळलेला राहाणार आहे. वादळ किनाऱ्यावर धडकताना वाऱ्यांचा वेग ताशी 120 किलोमिटर पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. तर ,मंगळवारी अरबी समुद्रात ताशी 190 किलोमिटरच्या वेगाने वारे वाहातील.

'महा' चक्रीवादळामुळे 6 ते 8 नोव्हेंबरला पालघर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याचसोबत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, गरज असेल तरच घराबाहेर पडावं असंही पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आवाहन केलंय 

गुजरातच्या किनाऱ्यावर वादळ पोहचाताना त्याचा प्रभाव उत्तर कोकणातील समुद्रावर दिवसणार आहे.खासकरुन ठाणे आणि पालघरच्या किनाऱ्यांवर त्याचा फटका बसणार आहे. बुधवारी (ता.6)किनाऱ्यांवरील वाऱ्याचा वेग ताशी 70 किलोमिटर पेक्षा जास्त वेगाने वाहाण्याची शक्‍यता आहे. ठाणे,पालघर बरोबरच या वादळामुळे धुळे,नंदूरबार,नाशिक या जिल्ह्यातील काही भागात बुधवारी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. 

No photo description available.

या वादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात वेगवान वारे वाहात असल्याने महामुंबईतील तापमान कमी होऊ लागले आहे. मुंबईतील कुलाबा येथे कमाल 32.8 आणि किमान 24 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर,सांताक्रुझ येथे 32.9 कमाल आणि किमान 23.6 अंश तापमानाची नोंद झाली असून पुढील काही दिवस तापानाच याच पध्दतीने राहाणार आहे. 

Webtitle : maha cyclone has become more powerful schools and colleges will remain closed on 6th to 8th november


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maha cyclone has become more powerful schools and colleges will remain closed on 6th to 8th november