महाडचा दादली पूल बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर कोसळलेली दरड हटविल्यानंतर येथील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. तसेच दादली पूल पाण्याखाली जाण्याची शक्‍यता असल्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळील नडगाव येथे दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीला अडचण निर्माण झाली होती. महामार्ग व संबंधित एल एण्ड टी कंपनीने त्वरित दरड हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

सावित्री नदीची पातळी वाढल्याने शहरांमधील सखल भागांत व बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले. पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने दादली पुलावरून पाणी जाण्याची शक्‍यता गृहित धरून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील वाहतूक सायंकाळपासून बंद केली.

त्यामुळे दापोली, विन्हेरे, मंडणगड, खाडी पट्टा भागातील वाहनचालकांची गैरसोय झाली. महाडमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील सखल भागांमध्ये अद्याप पाणी साठले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahad's Dadali Bridge closed