#MahalaxmiExpress : 'रेस्क्यू ऑपरेशन'मध्ये मुंबई अग्निशमन दल सहभागी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कोल्हापूरकडे निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री नऊच्या दरम्यान रुळावर पाणी जमल्याने वांगणी गावाजवळ अडकली. यावेळी महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये सातशेपेक्षा अधिक प्रवासी होते.

मुंबई : मुंबईसह ठाणे जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस वांगणी आणि बदलापूरच्यामध्ये अडकली. राज्य सरकारच्या विनंतीनंतर एक्सप्रेसमधील प्रवाश्यांच्या सुटकेसाठी वायुदल, नौदल, एनडीआरएफच्या जवनांसह मुंबई महापालिकेतील अग्निशमन दलातील जवानांनी ही रेस्क्यू ऑपरेशन करत महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कोल्हापूरकडे निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री नऊच्या दरम्यान रुळावर पाणी जमल्याने वांगणी गावाजवळ अडकली. यावेळी महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये सातशेपेक्षा अधिक प्रवासी होते. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्याने वांगणी परिसरात पाण्याची पातळी ही वाढली. यामुळे एक्सप्रेसमधील प्रवाश्यांपर्यंत पोहोचणं अवघड झालं, तर प्रवाश्यांनाही एक्सप्रेसमधून बाहेर पडण शक्य नव्हतं. राज्य सरकारच्या विनंतीनंतर नौदल आणि वायुदलाच चॉपर्स बचावकार्यासाठी रवाना झाले. मुंबई पालिकेने आपलं एनडीआरएफचं 40 जणांचं पथक आणि अग्निशमन दलातील जवानांना बाचावकार्याची तातडीने रवाना केले.

महालक्ष्मी एक्सप्रेसजवळ बचावकार्यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाली टीम सर्वात आधी पोहोचली. त्यांनी बदलापूर पालिका आयुक्तांच्या आदेशाने लागलीच एक्सप्रेसजवळ जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. आणि एक्सप्रेसमधील अनेक प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahalaxmi Express Mumbai fire brigade involved in rescue operation