Mahalaxmi Express : 500 जणांची सुटका; बचावकार्य सुरु

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

बदलापूर-वांगणी दरम्यान गोरेगावजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली. या गाडीत सातशे प्रवाशी अडकून पडले होते. यातील पाचशे जणांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या काही तासांपासून प्रवाशी अडकल्याने आणि रुळावर पाणी साचल्याने नागरिक भयभीत झाले होते.

मुंबई : वांगणीजवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून, आतापर्यंत 500 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ, नौदल आणि पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये नऊ गरोदर महिलांचाही समावेश आहे.

बदलापूर-वांगणी दरम्यान गोरेगावजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली. या गाडीत सातशे प्रवाशी अडकून पडले होते. यातील पाचशे जणांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या काही तासांपासून प्रवाशी अडकल्याने आणि रुळावर पाणी साचल्याने नागरिक भयभीत झाले होते. या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी NDRF, Navy, अग्निशमन दल, ठाणे, बदलापूर, स्थानिक गावकरी यांची मदत घेण्यात येत आहे.

मध्य रेल्वेनेही ट्विट करत रेल्वे पोलिस महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये असून, घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. रुळाच्या दोन्ही बाजूला महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदीला पूर आल्याने वांगणीजवळ रेल्वे रुळावर पाणी आले. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस तेथेच अडकून पडली. आता सध्याही रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahalaxmi Express rescue operation 500 people have been rescued till now