'महालक्ष्मी मंदिरासाठी डीपीआर तयार करा'

Subhash-Desai
Subhash-Desai

मुंबई - महालक्ष्मी मंदिर परिसराच्या विकासासाठी मंदिर ट्रस्ट आणि म्हाडाने संयुक्तरीत्या विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, भाविकांसाठी सर्व सोई-सुविधा आणि परिसरातील पूजा साहित्य विक्रेत्यांचा यामध्ये विचार करण्यात यावा, अशा सूचना उद्योगमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

महालक्ष्मी मंदिर आणि परिसराला देसाई यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली. मंदिर परिसरातील जुन्या इमारतींचा विकास जरीवाला मॅन्शनच्या धर्तीवर अतिरिक्त "एफएसआय' देऊन करता येईल, असे सांगून देसाई म्हणाले, जुन्या इमारतींच्या बाबतीत मंदिर समिती व स्थानिकांच्या हक्काला बाधा येणार नाही, याची सरकार काळजी घेईल. सुनियोजित विकासासाठी मंदिराच्या आजूबाजूच्या झोपडपट्टीचा पुनर्विकासही आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com