महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा प्रथमच होणार गौरव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मुंबई - आपल्या अतुलनीय शौर्याच्या बळावर देश संरक्षणात बाजी मारलेल्या महार बटालियनच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महार बटालियनच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे शनिवारी (ता. 15) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण व सत्कार समारंभ होणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत बडोले म्हणाले, "शूरवीर आणि लढवय्या महारांनी भारतीय सैन्याची मान सदैव उंच ठेवली. सैन्यातील शौर्याला एका सन्माननीय उंचीवर पोचविले. शौर्यशाली सैनिकांचे स्मरण करून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यांना गौरविण्यासाठी त्यांना पुरस्कार देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. इतिहासात महार रेजिमेंटच्या पराक्रमी सुपुत्रांचा सन्मान करणारे महाराष्ट्र सरकार हे पहिले सरकार आहे.
Web Title: Mahar Regiment Jawan Honor