खोपोलीत स्वच्छतेसाठी महारॅली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मुंबई : राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षण २०१९-२० साठी खोपोली शहर सज्ज झाले आहे. याची सुरुवात गुरुवारपासून झाली. येथील पंत पाटणकर मैदानात खोपोली नगरपालिका, केटीएसपी मंडळ, सहज सेवा फाऊंडेशन खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व लोकप्रतिनिधी, विविध शाळेतील हजारो विद्यार्थी, नागरिक, शिक्षक व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सामूहिकपणे स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर शहरात स्वच्छता जनजागृतीसाठी महारॅली काढण्यात आली.

या रॅलीत हजारो विद्यार्थी, शहरातील व्यापारी व नागरिकांनी सामूहिकपणे स्वच्छतेची सप्तपदी व जनजागृती केली. या आयोजनाचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या कार्यक्रमात रायगडचे जिल्‍हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार इरेश चपलवार उपस्‍थित होते. 

स्वच्छता सर्वेक्षणात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नगरपालिका कर्मचारी, महिला बचत गट, सार्वजनिक मंडळे, संस्था, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचा नगरपालिकेकडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्‍यात आला. हा कार्यक्रम पालिका नगराध्यक्ष सुमन औसरमल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी गणेश शेटे, उपनगराध्य राजू गायकवाड, आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharali for cleaning the khopoli