Maharashtra Budget Session: अधिवेशनावर कोरोनाचं सावट, ३२ जणांना कोरोनाची बाधा

Maharashtra Budget Session: अधिवेशनावर कोरोनाचं सावट, ३२ जणांना कोरोनाची बाधा

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी 3200 कोरोना चाचणी घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. 

त्यात दोन पत्रकार आणि पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विधीमंडळ, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं समजतंय. विधानभवन येथे केलेल्या कोरोना टेस्टमध्ये एकही आमदार पॉझिटीव्ह नसल्याची माहिती समोर आली आहे. बहुतेक आमदारांनी खासगी कोरोना टेस्ट केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण डाटा तूर्तास उपलब्ध नसल्याची माहिती विधान भवनाकडून मिळाली आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा होणार कोरोना चाचणी

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा कोरोना चाचणी होणार आहे. यंदाचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दहा दिवस होत आहे. 

अधिवेशन दहा दिवस होत असल्यामुळे दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.  पाच दिवस कामकाज पुन्हा एकदा कोरोना चाचणी होईल. जेणेकरून या पाच दिवसात कोणी कोरोना बाधित झाले तर स्पष्ट व्हावे, यासाठी दोन वेळा चाचणी करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10  मार्च असे दहा दिवस होत आहे.  8 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्चला बजेटवर चर्चा होणार आहे.  

Maharashtra Assembly Budget Session start today 32 people corona positive

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com