'त्या' बेपत्ता पाकिस्तान्यांचा ATS घेतेय शोध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

कित्येकदा परदेशी नागरिक न सांगताच दुसऱ्या ठिकाणी जातात. पण परतीच्या प्रवासाच्या वेळी ते मिळून येत असल्याचे तपास यंत्रणाचे म्हणणे आहे. बेपत्ता झालेल्या त्या पाकिस्तानी नागरिकांच्या शोधाकरता एटीएसचे अधिकारी गुंतले आहेत.

मुंबई : शहरात राहणारे काही पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्यात. त्या बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) घेत आहेत. शहरातील काही हॉटेल्स, लॉजची तपासणी केली गेली आहे. 

विविध देशातील नागरिक हे टुरिस्ट व्हिसावर मुंबईत येतात. मुंबईत आल्यावर त्यांची नोंद पोलिसांकडे होते. दर महिन्याला टुरिस्ट व्हिसावर आलेल्यांची माहिती पोलिस अपडेट करत असतात. भारतात आल्यावर त्यांचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती पोलिसांकडे जमा केली जाते. 

कित्येकदा परदेशी नागरिक न सांगताच दुसऱ्या ठिकाणी जातात. पण परतीच्या प्रवासाच्या वेळी ते मिळून येत असल्याचे तपास यंत्रणाचे म्हणणे आहे. बेपत्ता झालेल्या त्या पाकिस्तानी नागरिकांच्या शोधाकरता एटीएसचे अधिकारी गुंतले आहेत.

नुकतेच जुहु परिसरातून काही पाकिस्तानी बेपत्ता झाल्याने तपास यंत्रणाची झोप उडाली आहे. ते नेमके कोठे गेलेत, याचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांना शोधण्याची जबाबदारी महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्याच्या शोधाकरता एटीएसने हॉटेल्स, लॉजच्या तपासणीला सुरुवात केली आहे.

नेमके ते खरेच बेपत्ता झालेत का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही महिन्यांपूर्वी एक पाकिस्तानी नागरिक मुंबईत आला होता. तो मुंबईत नातेवाईकांना न भेटता गुजरात येथे गेला होता. एटीएसने त्याचा शोध घेतला असता तो गुजरातमध्ये नातेवाईकांकडे गेल्याचे उघड झाले होते. 

Web Title: Maharashtra ATS investigating missing Pakistani citizens in Mumbai