मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच वेग 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 मे 2018

मुंबई : महामंडळाच्या नियुक्‍त्या केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग येणार आहे. विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आठवड्यात दिल्लीला जाणार असल्याचे समजते.

दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत करून मंत्रिमंडळ विस्तार मे महिन्यात करण्यात येण्याची शक्‍यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विस्ताराबाबतच्या हालचालींना वेग येईल, असे सांगण्यात येते. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला 10-12 महिने शिल्लक आहेत. त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार शेवटचा ठरेल. या विस्तारात नव्यांना संधी देतानाच काही मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. राज्य सरकारने साडेतीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे.

या काळात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेतकरी मोर्चे, मराठा क्रांती मोर्चे, दलित मोर्चे आदींमुळे सरकारपुढे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे बोलले जाते. तसेच, शहरी विरुद्ध ग्रामीण असा सरकार भेदभाव करत असल्याची भावना ग्रामीण भागात असल्याचीही चर्चा आहे. उर्वरित कालावधीत चांगली कामे करून नागरिकांच्या मनातील या रोषाला उतारा देण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यामुळे प्रादेशिक समतोल, काम करण्याची क्षमता, नाराज घटक, निवडणुकीतील फायद्या-तोट्याचे गणित या बाबींचा सारासार विचार करून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल. सुमार कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांना डच्चू देऊन नव्यांना संधी देण्यावर भर राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Maharashtra Cabinet expansion expected soon