PHOTO : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतली शरद पवारांची भेट..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 December 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्व्हर ओकवर दाखल झालेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शर पवार यांनी आज 80 व्या वर्षात पदार्पण केलंय. या निमित्ताने अनेकांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. देशभरातून शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी देखील शरद पवार यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्यात.

हेही वाचा :  पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा!

राजकारणातील चाणक्य, जाणता राजा अशा अनेक विशेषणांनी शरद पवारांना ओळखलं जातं. याच शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. म्हणूनच महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्व्हर ओकवर दाखल झालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आमदार आदित्य ठाकरे हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत. याचसोबत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, राष्ट्रवादी नेते अजित पवार, आणि संपूर्ण कुटुंब हजर होतं.     

राज्यातील राजकारणात सर्वात जास्त काळ सक्रीय असणारे शरद पवार यांचा आजचा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला. शरद पवारांच्या वाढदिवशी राज्यभरातून कार्यकर्ते महाराष्ट्रात दाखल झालेत.

हेही वाचा :  होय! फक्त 80 पैसे किलोने मिळाला कांदा

आज युवक काँग्रेसच्या वतीने ‘परिवर्तनाचा महानेता’ या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा देखील आली. शिवाय संपूर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप देखील करण्यात आलं. मुंबई युवकांच्या वतीने सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान  देखील राबवण्यात आलं. 

maharashtra cm uddhav thackeray and his family met sharad pawar at his residence 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra cm uddhav thackeray and his family met sharad pawar at his residence