esakal | मेट्रो-3 कामाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो-3 कामाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात...

मेट्रो-3 कामाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मेट्रो-3 मार्गिकेतील पॅकेज 6 अंतर्गत सहार रोड स्थानकाची पाहणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून समाधान व्यक्त केले याशिवाय काही सूचना देखील केल्या. यावेळी पालकमंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर ए राजीव, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल, संचालक (प्रकल्प), Mumbai Metro Rail Corporation चे एस.के.गुप्ता आणि आर. रामनाथ उपस्थित होते. 

मोठी बातमी - हं... हनीमूनला जाताय, मग 'या' गोष्टी सोबत असू द्या !

मुख्यमंत्र्यांनी कॉर्पोरेशनच्या अधिकारी व अभियंत्यांकडून सध्या सुरू असलेल्या मेट्रो-3 च्या कामाचा आढावा घेतला व त्यावर समाधान व्यक्त केले. त्यांनी मेट्रोसाठी खोदलेल्या मोठ्या बोगद्यात फिरून कामाची पहाणीही केली. 

मोठी बातमी - दाढीमुळे तुम्हाला आहे 'कोरोना' व्हायरसचा धोका ?

सहार रोड स्थानकाचे भुयारीकरण 48% पूर्ण झाले असून पॅकेज -6 चे एकूण काम 59% पूर्ण झाले आहे. सहार रोड स्थानकाची लांबी 218 मीटर असून रुंदी 30 मीटर आहे. मेट्रो मार्गिकेच्या ट्रॅकचे आंतर बदल (inter change) व्हावे यासाठी सहार रोड ते सीएसएमआय ए आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकादरम्यान भूमिगत सीझर क्रॉस ओव्हर बांधण्यात येणार येत आहे. 266 मीटर लांब 16 मीटर रुंद असलेल्या सीझर क्रॉस ओव्हरचे बांधकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीद्वारे करण्यात येत आहे. पॅकेज -6चे एकूण 59% काम तर 73% भुयारीकरण पूर्ण झाले आहे.  

maharashtra cm uddhav thackeray comments on metro three projects

loading image