
Vande Bharat Express : महाराष्ट्राला मिळणार पाचवी वंदे भारत ट्रेन; कसा असणार मार्ग?
मुंबई : मध्य रेल्वेवर सीएसएमटी - शिर्डी आणि सीएसएमटी सोलापूर वंदे भारत ट्रेन सुरु झाल्यानंतर आता राज्यातील पाचवी मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन धावण्यासाठी सज्ज झाली आहे. रेल्वेकडून आज सीएसएमटी-मडगांव दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट ट्रेनची चाचणी घेण्यात येणार आहेत. या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक्षात मुंबई - गोवा दरम्यान वंदे भारत ट्रेन धावणार आहे.
भारतीय रेल्वेने हायटेक आणि अत्याधुनिक सेमी-हाय स्पीड ट्रेन अर्थात वंदे भारत एक्सप्रेस देशभरता सुरु करण्याचा जणूकाही सपाट लावलेला. आता राज्याला पाचवी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. ही पाचवी वंदे भारत ट्रेन मुंबई ते गोवा दरम्यान धावणार आहे. नुकताच मुंबई- गोवा रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाले आहे.
मार्च महिन्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर आता भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर सीएसएमटी - मडगांव दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु करण्याच्या नियोजन केले आहेत. वंदे भारत ट्रेनचे मंगळवारी (ता.१६) चाचणी घेण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी ५.३५ मिनिटांनी सीएसएमटीवरून सोळा डब्याची वंदे भारत ट्रेन मडगांवसाठी रवाना होणार आहे. या चाचणी दरम्यान रेल्वे बोर्डाचे आणि मध्य आणि कोकण रेल्वेचे अधिकारी उपस्थितीत असणार आहेत.
१४ मार्गांवर वंदे भारत ट्रेन
वंदे भारत ही अत्याधनिक ट्रेन असून सध्या देशभरात १४ मार्गांवर धावत आहे. यापैकी मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते सोलापूर आणि नागपूर ते बिलासपूर मार्गावर महाराष्ट्रात वंदे भारत ट्रेन धावत आहे. आता पाचवी वंदे भारत ट्रेन मुंबई ते गोवा दरम्यान धावणार आहेत. त्यामुळे मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसच्या एका गाडीची किंमत सुमारे ११० कोटी आहे. प्रवासी सुविधेसाठी अपघात रोधक कवच यंत्रणा या गाडीत कार्यान्वित आहे.
अशा असणार सुविधा - वंदे भारत ट्रेनचे वैशिष्ट्य!
- ताशी १८० ते २०० किमी वेगाने धावणार
- संपूर्ण डबे वातानुकिलत असणार
- जीपीएसआधारित ऑडिओ व्हिज्यूअल माहिती प्रणाली
- स्वयंचलित खिडक्या आणि दरवाजे
- अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे
- प्रत्येक डब्यात इमरजेंसी पुश बट
- वैक्युम आधारित टायलेट
- १८० डिग्री फिरणारी आसने