esakal | 'या' आहेत सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी..  
sakal

बोलून बातमी शोधा

'या' आहेत सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी..  

महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागात ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी 405 पद आहेत. मत्स्य विभागात सहाय्यक मत्स्यविभाग विकास अधिकारी पदासाठी 37 पद तर औरंगाबादमध्ये मृद आणि जलसंधारण विभागात 182 पद आहेत.  

'या' आहेत सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी..  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येत्या वर्षात राज्यात विविध सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यात रिझर्व्ह बँक, प्राप्तिकर विभाग, कस्टम्स, आणि सीबीआय या विभागांमध्येही कारकून पदाची भारती होण्याची शक्यत आहे. याचसोबत पोस्ट, म्हाडा, बँकिंग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मत्स्य आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे कृषी विभागातही नोकरीच्या साधी उपलब्ध होणार आहेत.  महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व नोकर्या अगदी दहावी पास ते उच्चशिक्षित या  सर्वांसाठीच उपलब्ध आहेत. 

महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागात ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी 405 पद आहेत. मत्स्य विभागात सहाय्यक मत्स्यविभाग विकास अधिकारी पदासाठी 37 पद तर औरंगाबादमध्ये मृद आणि जलसंधारण विभागात 182 पद आहेत.  
 

राज्यातील अतिशय महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र. या आहेत कृषी क्षेतत्रातील नोकरीच्या संधी :

  • औरंगाबादमध्ये 112 रिक्त पदांसाठी आहे भारती  
  • नागपूरमध्ये 249 रिक्त पदांसाठी आहे भारती  
  • अमरावतीमध्ये 239 रिक्त पदांसाठी आहे भारती  
  • लातूरमध्ये 169 रिक्त पदांसाठी आहे भारती  

यासोबतच ठाणे, पुणे, नाशिक, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील कृषीसेवक पदांसाठी नोकरीच्या संधी आहेत.

पोस्टातील नोकरीबद्दल :  

महाराष्ट्रात तब्बल 3650 पदांसाठी भारती होणार आहे. पोस्टमन सहाय्यक पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर आहे. यासाठी शिक्षणाची अट ही दहावी उत्तीर्ण आणि संगणकीय ज्ञान अशी आहे

म्हाडातील नोकऱ्या :

म्हाडामध्ये सध्या मंजूर पद आणि कर्मचारी संख्येत तफावत आहे. अशात आता म्हाडाच्या मुंबईतील वांद्रेइथल्या हेड ऑफिससह इतर विभागीय कार्यालयांमध्ये 500 नोकऱ्या आहेत. यासाठी रीतसर अर्ज काढले जाणार आहेत. त्यानंतर मुलाखती द्वारा भरती होणार आहे 

WebTitle : maharashtra government job vacancy details

loading image