ग्रामपंचायत निवडणूक निकाल: कोकणात सेनेचा बालेकिल्ला खोटा ठरवला, भाजपची टीका

ग्रामपंचायत निवडणूक निकाल: कोकणात सेनेचा बालेकिल्ला खोटा ठरवला, भाजपची टीका

मुंबईः आज सकाळपासून महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर होत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.  या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.  या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. 

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं असल्याचं वक्तव्य केशव उपाध्ये यांनी केले आहे.  तीन पक्ष एकत्र आले आणि त्याविरुद्ध भाजप असं म्हणत साम दाम दंड या सगळ्याचा त्यांनी वापर केला. तरी सुद्धा भाजपला यश मिळालं आहे, असं उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. 

थेट सरपंच निवडणूक रद्द केली असली तरी आणि नंतर सरपंच निवडणार असा निर्णय सरकार ने घेतलेला. राज्य सरकारबाबत मोठी नाराजी गावात दिसली, असंही ते म्हणालेत.

केंद्र सरकारने शेतीबाबतचे मोठे निर्णय केले त्याची चर्चा दिसून आली, असंही त्यांनी म्हटलं आहे. 14 हजार पैकी 6 हजार ग्रामपंचायतमध्ये भाजप आघाडीवर आहे आणि हा आकडा वाढणार, असा विश्वासही केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे. 

कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला हा खोटा ठरवत भाजपने अनेक ठिकाणे जिंकले, असंही उपाध्ये म्हणालेत. 

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 bjp keshav upadhyay press conference

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com